"अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ: चांदूरबाजार तालुकाध्यक्षपदी डॉ. राहुल अहिर, तर सौ. सुरेखा दामेधर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड" - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 27, 2026

"अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ: चांदूरबाजार तालुकाध्यक्षपदी डॉ. राहुल अहिर, तर सौ. सुरेखा दामेधर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड"


अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ चांदूरबाजार तालुका अध्यक्षपदी डॉ. राहुल अहिर  व अमरावती जिल्हा महिला मंच जिल्हा उपाध्यक्षपदी सौ सुरेखा दामेधर यांची निवड
 


चांदूरबाजार दिनांक २८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)


पत्रकारांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या संघटनात्मक बांधणीला बळकटी देण्यासाठी नुकतीच महत्त्वाची घोषणा करण्यात आली.

       अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची चांदुर बाजार तालुका सभा संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने यांचे अध्यक्ष खाली संपन्न झाली या सभेत तालुकाध्यक्षपदी डॉक्टर राहुल अहिर यांची निवड करण्यात आलेली आहे.

ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे या उद्देशाने कार्यरत असलेल्या या संघटनेने चांदूरबाजार तालुक्याची जबाबदारी डॉ. राहुल अहिर यांच्याकडे सोपवली आहे

उपाध्यक्षपदी ॲड. राजेश खडसे, व अमृत काशीकर तर प्रताप गवई  यांची सचिव, व अ. कलीम अ.कदीर संघटकपदी, निवड करण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे अमरावती जिल्हा महिला मंच मध्ये सौ. सुरेखा विलासराव दामेधर जिल्हा उपाध्यक्ष तर सौ. नीलिमा  बबनराव निमकर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आलेली आहे.

चांदूर बाजार तालुका महिला मंच ग्रामीण अध्यक्ष सौ. मीरा खडसे, तर सचिव पदी सौ. रुक्मिणी सहारे , कोषाध्यक्ष सौ. ज्योती  सुनील कपले, संघटक सौ. जयश्री सतीश राजस यांची निवड करण्यात आली आहे.

चांदूरबाजार शहर महिलामंच अध्यक्षपदी सौ. आयशा फिरोज खान तर सचिव पदी सौ.नेहा अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. 

सभेला केंद्रीय संपर्कप्रमुख अरुण कुलथे, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे, केंद्रीय प्रसिद्ध प्रमुख सागर सवळे , मदन भाटे ज्येष्ठ पत्रकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

सभेला पत्रकार शरद केदार, संपादक संदीप वानखडे, पत्रकार विलास खाजोने, मनोज बारस्कर ,रोशन जयसिंगपूरे,सचिन वानखडे, संदीप मानमोडे, सौ. सुवर्णा निमकर, पुनम तुमाने, डॉ. सौरभ नागापुरे, सौ. रुक्मिणी सहारे उपस्थित होते. 

या निवडीची घोषणा होताच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या निवडीचे स्वागत करत, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या न्याय्य हक्कासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले आहे.
पुढील पाऊल:
 "तालुक्यातील प्रत्येक पत्रकाराला संरक्षण आणि सन्मान मिळवून देणे हे माझे पहिले कर्तव्य राहील." असे या सर्व पत्रकारांनी आश्वासन दिले आहे. 
सभेमध्ये पत्रकार वीमा व सामाजिक उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages