सर्फापूर विद्युत वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशन कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, January 26, 2026

सर्फापूर विद्युत वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशन कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न

 


दि.२७ 
शिरजगाव कसबा (सर्फापूर)
 (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क):
२६ जानेवारी ध्वजारोहन दीना निमित्य 33 KV सबस्टेशन सर्फापूर विद्युत वितरण कंपनीच्या पॉवर स्टेशन कार्यालयात सोमवारी येथे ध्वजारोहण कार्यक्रम श्री दिनेश भटकर प्रधान यंत्रचालक यांच्या हस्ते करण्यात आले आहे .यावेळी 'जन गण मन' या राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
  या प्रसंगी सबस्टेशन चे इनचार्ज  श्री  AE स्वप्नील  हेटे  , श्री खराळकर, श्री बुरनासे श्री कथीलकर, श्री अंबोरे, श्री कास्देकर, श्री चव्हान, श्री बन्सोड ,श्री दातीर, श्री माहुलकर ,श्री बीरे, श्री बेलसरे, मॅडम श्री शेवतकर व सीक्युरेटी गार्ड श्री घुलक्षे, श्री गायकवाड श्री कवीटकर ,श्री जाने व  गावकरी या  ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते.
तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी, वायरमन, तांत्रिक कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
शहिदांना अभिवादन: ध्वजारोहणानंतर देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या वीर जवानांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
सुरक्षा प्रतिज्ञा: 'वीज सुरक्षा आणि ग्राहक सेवा' या विषयावर कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रतिज्ञा घेतली
अधिकारी यांचे मनोगत:
"प्रजासत्ताक दिन हा आपल्या संविधानाचा उत्सव आहे. वीज कर्मचारी म्हणून जनतेला अखंडित सेवा देणे, हेच आमचे कर्तव्य असून आजच्या दिवशी आम्ही अधिक सक्षमपणे काम करण्याचा संकल्प सोडला आहे," असे प्रतिपादन यावेळी मुख्य अधिकाऱ्यांनी केले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages