'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा': दिव्य सदन संस्थेकडून अमरावती जिल्ह्यात आरोग्य सेवेचा यज्ञ - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा': दिव्य सदन संस्थेकडून अमरावती जिल्ह्यात आरोग्य सेवेचा यज्ञ

 


दयासागर दवाखान्यातील तज्ज्ञांकडून ४०० ग्रामस्थांची मोफत आरोग्य तपासणी; दिव्य सदन संस्थेचा उपक्रम 
    
   


दि. २६ग्राम. कामूंजा ता. जि. अमरावती :-  रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा या उक्ती प्रमाणे समाजसेवेचे अमूल्य कार्य गेल्या ५० वर्षांपासून करत असणाऱ्या दिव्य सदन सोशल सेंटर या सेवाभावी संस्थे अंतर्गत ग्राम. कामूंजा ता. जि. अमरावती येथे आरोग्य तपासणी  व उपचार शिबीर पार पडले. शिबिरामध्ये सावरखेड, कामूंजा, ओझरखेड, कुंड सर्जापूर, वारवाढ आणि पंचक्रोशीतून  येणाऱ्या  ४०० पेक्षा जास्त लाभार्थ्यांना मोफत तपासणी सल्ला व उपचार करण्यात आला आणि मोफत औषधी वितरण सुद्धा करण्यात आले. शिबिरा मध्ये दयासागर दवाखान्यातील तज्ञ् डॉक्टर मा. सोनाक्षी मॅडम (स्त्रीरोग तज्ञ्) मा. तबस्सुम मॅडम (बाल रोग तज्ञ् व जनरल फिजिशियन) यांनी आपली सेवा दिली. औषधी वितरण जबाबदारी सिस्टर नमिता, सिस्टर ऑल्विना यांनी केले.

 तसेच शिबिरामध्ये रक्त तपासण्या करण्यात आल्या ज्या मध्ये BP , शुगर, थायरॉईड, CBC, LFT इत्यादीचा समावेश आहे. शिबिरामध्ये प्रामुख्याने महिला, बालक व वृद्ध लोकांसाठी विषेश औषधवितरण सुद्धा करण्यात आले जेणेकरून महिलांना व वृद्ध आणि बालकांना पोषण प्राप्त होऊन त्याचे आरोग्य सुधारल्या जाईल. या शिबिराचे संपूर्ण नियोजन व जबाबदारी संस्थेच्या संचालिका मा. सिस्टर जोसना यांनी पार पडली. तसेच समाजाच्या सेवेसाठी दिव्य सदन नेहमी तत्पर राहील असे प्रतिपादन आपल्या मनोगतातून दिले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी सिस्टर अल्बिना, सिस्टर अलकारानी, अक्षय आठवले (प्रकल्प समन्वयक), समुदाय संघटक, आशिष राखोंडे, अनिरुद्ध गेडाम आणि सौरव अवसरमोल, भूषण टेकाडे, रवी मोरे , विद्या काकडे, अम्रपाली बडगे, रमा वाकोडे, कविता गणवीर, संपूर्ण ऍनीमिटर ,स्थानीक आशा सेविका यांनी प्रयत्न केले. गावकऱ्यांनी शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि संस्थेचे  आभार सुद्धा व्यक्त केले. जनसामान्यांच्या सेवेसाठी संस्था नेहमीच्या कार्यरत राहील अशे आश्वासन मा. संचालिका यांनी दिले.    


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages