जनसंवाद कार्यक्रमात ७४ नागरिकांचे निवेदने प्राप्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, January 25, 2026

जनसंवाद कार्यक्रमात ७४ नागरिकांचे निवेदने प्राप्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी थेट संवाद

 


           


अमरावती, दि. २६ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दि.२४ तारखेला  विश्रामगृह येथे जनसंवाद कार्यक्रमात विविध क्षेत्रातील समस्याबाबत नागरिकांनी निवेदने सादर केली. झालेल्या या  कार्यक्रमात जिल्ह्याभरातून 74 निवेदने प्राप्त झालीत. यावेळी त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी यावेळी जाणून घेतल्या.

जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलिस आयुक्त राकेश ओला, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस अधीक्षक विशाल आनंद यावेळी उपस्थित होते.

             जनसंवाद  कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पालकमंत्री यांना प्राप्त झालेले निवेदने त्यांनी संबंधित विभागाकडे देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

               वीज बिल, मालकी पट्टे, रस्ते, नोकरी, कृषी, शेतकरी आत्महत्या, घरकुल, रस्ते, पाणी, क्रीडा, आरोग्य, बांधकाम या विविध विषयांवरील निवेदने प्राप्त झाली. अनेक नागरिक वैयक्तिक समस्यांची निवेदने घेऊन जनसवांद कार्यक्रमात आले. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी नागरिकांच्या संबंधित निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या.  यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages