कॉपी बहादरांना चाप: विद्यार्थी आणि शिक्षकांवरही होणार कठोर कारवाई! - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, January 23, 2026

कॉपी बहादरांना चाप: विद्यार्थी आणि शिक्षकांवरही होणार कठोर कारवाई!

 


आता केवळ विद्यार्थीच नाही, तर कॉपीला मदत करणारे शिक्षकही मोजणार तुरुंगाची हवा!

  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी ही 'शिक्षासूची' तयार करण्यात आली आहे. 

परीक्षामधील कॉफी  आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने २०२६ च्या बोर्ड परीक्षांसाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या नियमांनुसार केवळ विद्यार्थीच नाही, तर गैरप्रकारांना खतपाणी घालणारे शिक्षक आणि परीक्षा केंद्र चालकही कारवाईच्या कक्षेत येणार आहेत.

शिक्षासूची: शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांना non-copying campaign (कॉपीमुक्त अभियान) साठी शिक्षासूची  पाठवली आहे.

'कॉपीमुक्त अभियान' आणि शपथ: २०२६ च्या १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेत बसणाऱ्या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच परीक्षेपूर्वी गैरप्रकार न करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे

विद्यार्थ्यांसाठी शिक्षा: गैरप्रकाराचे स्वरूप आणि चौकशीनुसार विद्यार्थ्यांची संबंधित विषयाची संपादणूक रद्द करणे, संपूर्ण परीक्षेची संपादणूक रद्द करणे किंवा पुढील परीक्षांना बसण्यापासून प्रतिबंध करणे अशा शिक्षांची तरतूद आहे.

शिक्षकांसाठी शिक्षा: कॉपीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील. असे गुन्हे दखलपात्र  आणि बिगर-जामीनपात्र  असतील . तसेच, दोषी शिक्षकांचे निलंबन किंवा सेवा समाप्तीसारखी कठोर कारवाई केली जाऊ शकते. गैरप्रकारात दोषी आढळणाऱ्या शिक्षकांचे मानधन जप्त करणे, त्यांना परीक्षा कामापासून वंचित ठेवणे, संबंधित संस्थेला त्यांच्यावर कारवाई सुचवणे आणि पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तरतूद नियमावलीत आहे.

परीक्षांचे वेळापत्रक: बारावीची लेखी परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान आणि दहावीची लेखी परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान होणार आहे (२०२६ वर्षाच्या संदर्भात).

परीक्षा केंद्रांवर बंदी: ज्या परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर कॉपीचे प्रकार आढळतील, अशा केंद्रांची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल

अंमलबजावणी: कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी परीक्षा केंद्रांवरील केंद्रसंचालक आणि पर्यवेक्षक यांची अदलाबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेरे आणि 'फेशिअल रिकग्निशन' सिस्टीमचा वापर केला गेला.

    • १०० मीटर परिसरात जमावबंदी: परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही आणि जवळची सर्व फोटोकॉपी (झेरॉक्स) दुकाने परीक्षा काळात बंद राहतील
    • सतर्कता समित्या: जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या नेतृत्वाखाली विशेष भरारी पथके  नियुक्त करण्यात आली आहेत, जी अचानक तपासणी करतील. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages