निलेश बदुकले हत्याकांडातील दोषींना फाशी द्या – सौ.सुरेखा दामेधर यांची ठाम मागणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, January 27, 2026

निलेश बदुकले हत्याकांडातील दोषींना फाशी द्या – सौ.सुरेखा दामेधर यांची ठाम मागणी




चांदुर बाजार - (सौ. विद्या दाभाडे) ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क-दि.२९जानेवारी-

                चांदुर बाजार पोलीस स्टेशन हद्दीत काही दिवसांपूर्वी निलेश बदुकले यांची रेकी करून निर्घृण हत्या करण्यात आली.या गंभीर गुन्ह्यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आले असले तरी उर्वरित आरोपींवर कारवाई झाली असूनही संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व दोषींना  फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुरेखा विलास दामेधर यांनी केली आहे.या मागणीसाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने चांदुर बाजार तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. हे निवेदन राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. सुरेखा दामेधर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.यावेळी तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार व नायब तहसीलदार उपस्थित नसल्यामुळे नैसर्गिक आपत्ती विभागाचे महसूल अधिकारी राहुल बोबडे यांनी निवेदन स्वीकारले.सौ. दामेधर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “निलेश बदुकले यांची हत्या ही पूर्वनियोजित असून समाजात भीती निर्माण करणारी आहे.अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी दोषींना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. अन्यथा गुन्हेगारांचे मनोबल वाढत जाईल.”या निवेदनावेळी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. राहुल अहिर, उपाध्यक्ष ॲड. राजेश खडसे, अमृत काशीकर, सचिव प्रताप गवई, तालुका प्रतिनिधी (दैनिक दिव्यक्रांती) अ. कलीम अ. कदीर, तालुका संघटक उपस्थित होते.तसेच अमरावती जिल्हा महिला मंचामधून जिल्हा उपाध्यक्ष सौ. सुरेखा विलासराव दामेधर, जिल्हा संघटक सौ. नीलिमा बबनराव निमकर, चांदुर बाजार तालुका महिला मंच ग्रामीण अध्यक्षा सौ. मीरा खडसे, सचिव सौ. रुक्मिणी सहारे, कोषाध्यक्ष सौ. ज्योती सुनील कपले, संघटक सौ. जयश्री सतीश राजस उपस्थित होत्या.याशिवाय  केंद्रीय संपर्कप्रमुख अरुण कुमार कुलथे, केंद्रीय कार्यालय प्रमुख बाबाराव खडसे,केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख सागर सवळे, मदन भाटे, शरद केदार, संदीप वानखडे, पत्रकार विलास खाजोने, मनोज बारस्कर, रोशन जयसिंगपूरे, सचिन वानखडे, संदीप मानमोडे, सौ. सुवर्णा निमकर, पूनम तुमाने, डॉ. सौरभ नागापुरे आदी पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निलेश बदुकले हत्याकांडातील दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्यात यावी व संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यात यावा,अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages