शिरसगाव कसबा: संत गाडगेबाबा अभ्यासिका केंद्रात पुण्यतिथीचा कार्यक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, December 21, 2025

शिरसगाव कसबा: संत गाडगेबाबा अभ्यासिका केंद्रात पुण्यतिथीचा कार्यक्रम


 दि.२२ 
शिरसगाव कसबा :-वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी संत गाडगेबाबा अध्ययन केंद्रात साजरी करण्यात आली. संत गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा जपत बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक नागरिकांच्या आशीर्वादाने गाडगेबाबा अध्ययन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी संत गाडगेबाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या सुमित देवताले आणि जान्हवी अस्वार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना बबलू आवारे यांनी केली. याप्रसंगी सतीश सुरडकर, अनिल गुप्ता, मंगेश सातपुते, संजय झिंगरे, संदीप ढोले आणि पत्रकार अक्षय गुर्जर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages