अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक निकाल: नगराध्यक्षपदी अविनाश गायगोले विजयी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, December 21, 2025

अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक निकाल: नगराध्यक्षपदी अविनाश गायगोले विजयी


दि. २२ 
अंजनगाव सुर्जी (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) :- 
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अविनाश गायगोले यांनी नगराध्यक्षपदासाठी विजय मिळवला आहे.
अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गायगोले यांनी एकहाती विजय मिळवत नगराध्यक्ष पदाची हॅट्ट्रिक साधली. २१ डिसेंबर २०२५ रोजी येथील तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रकाशराव बोंडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार शैलेश पुरोहित यांचा पराभव केला. अविनाश गायगोले यांना ८८८४ मते मिळाली, तर काँग्रेसच्या प्रकाशराव बोंडे यांना २११४ व शिवसेनेच्या शैलेश पुरोहित यांना ४१२३ मते मिळाली. एकूण १६५२१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. यात ३८८ मतांची नोटा नोंदविण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार श्यामला परंडे यांनी तर मुख्याधिकारी पल्लवी सोनोने यांनी काम पाहिले.
अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे आहे:
पक्षजागा
भाजप१२
काँग्रेस३
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)४
पराभूत उमेदवारांना मिळालेली मते:
काँग्रेस उमेदवार: २,११४ मते
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार: ४,१२३ मतेअंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक निकाल जाहीर : नगराध्यक्षपदासाठी भाजप चे अविनाश गायगोले विजयी,
भाजपचे नगरसेवक विजयी
प्रभाग १ (अ) रेखा गायगोले, (ब) विनोद किल्लेदार
प्रभाग २ (अ) सुजाता ठाकरे, (ब) विनोद डहाके
प्रभाग ३ (अ) सुप्रिया ढोबळे, (ब) राहुल वानखडे
प्रभाग ४ (अ) संगीता ढोके, (ब) विजय निंभोरकर
प्रभाग ५ (अ) अनिता सवळे, (ब) योगेश मानकर
प्रभाग ६ (अ) सुरेखा वाडेकर, (ब) अमोल वाडेकर
काँग्रेसचे नगरसेवक विजयी
प्रभाग ७ (अ) बानो अ. रसीद, (ब) अ. कलाम अ. रसीद
प्रभाग ८ (अ) कविता विघे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगरसेवक विजयी
प्रभाग ९ (अ) कल्पना डवळे, (ब) अमोल काळे
प्रभाग १० (अ) शाहीनबी अ. गफार (ब) अ. रऊफ अ. गफार
यात २१ पैकी १२ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. काँग्रेसला ३, शिवसेनेला (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ४ जागा मिळाल्या आहेत. यात एका अपक्ष उमेदवारानेही बाजी मारली आहे.
विजयी उमेदवार अविनाश गायगोले यांनी अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या विकासासाठी नागरिकांनी पुन्हा एकदा विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages