आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, December 19, 2025

आरटीओ कार्यालयात वाहन तपासणीचे होणार व्हिडिओ रेकॉर्डिंग

 



अनुभवी पुरवठादारांकडून दरपत्रके आमंत्रित

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): प्रादेशिक परिवहन कार्यालय, अमरावती येथे वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाची प्रक्रिया आता अधिक पारदर्शक होणार असून, केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार होणाऱ्या संपूर्ण वाहन तपासणीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन आयुक्त कार्यालयाच्या मान्यतेनुसार, ही व्हिडिओ रेकॉर्डिंगची प्रक्रिया भाडे तत्त्वावर राबवली जाणार असून, यासाठी अनुभवी व्हिडिओ रेकॉर्डिस्ट आणि पुरवठादारांकडून मोहोरबंद दरपत्रके मागविण्यात आली आहेत.

प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक अनुभवी व्यक्ती किंवा संस्थांनी आपली दरपत्रके 'प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रादेशिक परिवहन कार्यालय, कॅम्प, अमरावती - 444602' या पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे. दरपत्रके सादर करण्याची अंतिम मुदत 29 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. वाहन चाचणीच्या प्रक्रियेत अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी हा व्हिडिओ रेकॉर्डिंगचा उपक्रम प्रस्तावित करण्यात आला असून, विहित मुदतीत जास्तीत जास्त अनुभवी अर्जदारांनी आपले दरपत्रक सादर करावे, असे आवाहन आरटीओ कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages