आंतरराष्ट्रीय एआय परिषदेचे उद्घाटन संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, December 20, 2025

आंतरराष्ट्रीय एआय परिषदेचे उद्घाटन संपन्न

 




डिजिटल हेल्थ आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथे 'सामाजिक विकासासाठी एआय नवकल्पना' (ICAIISD-2025) या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज संपन्न्‍ा झाले.

प्राचार्य डॉ. आशिष महल्ले यांनी बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून संशोधन आणि समाजोपयोगी तंत्रज्ञान यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे हाच या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. या परिषदेमुळे शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग जगतातील दुवा अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना जागतिक संशोधनाची दिशा समजण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते 'बुक ऑफ ॲबस्ट्रॅक्ट'चे प्रकाशन करण्यात आले.

समीर सावरकर यांनी आरोग्य क्षेत्रात एआयच्या भूमिकेबाबत सांगितले की, ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी एआय आधारित स्क्रीनिंग तंत्रज्ञान क्रांतिकारी ठरू शकते. तसेच, एसीएम नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष रविंद्र केसकर यांनी संशोधनातील डेटा विश्लेषणाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. निरंजन जोशी यांनी अभियंत्यांनी तांत्रिक ज्ञानासोबत सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. परिषदेतील मुख्य आकर्षण ठरलेल्या विशेष सत्रात आयआयएससी बंगळुरूचे प्रा. डॉ. फणिंद्र कुमार यलवर्थी यांनी 'डिजिटल हेल्थ'वर मार्गदर्शन केले. त्यांनी आरोग्य क्षेत्रातील एज कम्प्युटिंग, थ्री-डी संकल्पना आणि एआय समोरील आव्हाने याविषयी माहिती दिली. आयोजन समितीचे समन्वयक डॉ. शंतनु लोही यांनी आभार मानले.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages