राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, December 1, 2025

राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी जाहीर

  


अमरावती, दि. २ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांना मानधन योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेसाठी जिल्हा परिषद अंतर्गत एकूण 579 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले होते. जिल्हा निवड समितीमार्फत त्यापैकी एकूण 77 लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली आहे.

  त्यापैकी जिल्हा परिषद व महानगरपालिका क्षेत्रातील 57 लाभार्थ्यांची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. नगरपालिका क्षेत्रातील 20 लाभार्थ्यांची यादी आचारसंहितेनंतर जाहीर करण्यात येईल, अशी माहिती जिल्हास्तरीय निवड समितीचे सदस्य सचिव यांनी दिली आहे .


--

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages