ऐतिहासिक निर्णय: गृहमंत्रालयाचे निर्देश, सर्व राजभवनांचे 'लोकभवन' नामकरण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, December 2, 2025

ऐतिहासिक निर्णय: गृहमंत्रालयाचे निर्देश, सर्व राजभवनांचे 'लोकभवन' नामकरण


दि.२ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): केंद्रीय गृहमंत्रालयाने देशभरातील सर्व राजभवनांचे नाव बदलून आता अधिकृतपणे 'लोकभवन' (Lok Bhawan) असे ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

 केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात २५ नोव्हेंबर २०२५ रोजी अधिसूचना जारी केली.

 ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेली 'वसाहतवादी मानसिकता' सोडून देणे आणि या वास्तू-संस्थांना अधिक लोकशाहीवादी व लोककेंद्रित स्वरूप देणे, हा या नामकरणामागील मुख्य हेतू आहे.

राज्यपाल निवास: 'राजभवन' ऐवजी आता 'लोकभवन' म्हणून ओळखले जाईल

नायब राज्यपाल निवास: 'राज निवास' ऐवजी आता 'लोकनिवास' म्हणून ओळखले जाईल.

 ही नावे तत्काळ प्रभावाने लागू झाली असून, सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांच्या अधिकृत पत्राचार आणि फलकांवर नवीन नावांचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे.

 पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि तामिळनाडू यांसारख्या काही राज्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आधीच कार्यवाही सुरू केली आहे. महाराष्ट्रातही लवकरच राजभवनाच्या फलकांवर 'लोकभवन' असे नाव झळकण्याची शक्यता आहे. 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages