माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन





अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

           

 अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात काल निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी श्री. काकडे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

             यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चाफले, अधिक्षक निलेश खटके यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages