एमएसएमई उद्योजकांना सेन्ट्रल बँक ऑफ इंडियातर्फे २१ नोव्हेंबरला कर्ज मेळावा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

एमएसएमई उद्योजकांना सेन्ट्रल बँक ऑफ इंडियातर्फे २१ नोव्हेंबरला कर्ज मेळावा



अमरावती, दि. २० (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रिय कार्यालय, अमरावती यांच्या पुढाकाराने  एमएसएमई आऊटरीच प्रोग्रामचे आयोजन एम आय डी सी टाउन हॉल, ओल्ड बाईपास रोड, दस्तूर नगर, अमरावती येथे  शुक्रवार, दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 12 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश स्थानिक उद्योजक, सूक्ष्म व लघु उद्योग व्यावसायिक, नवीन स्टार्ट-अप्स तसेच महिलांसाठी उपलब्ध विविध एमएसएमई कर्ज योजना, व्याजदर सवलती, Credit Guarantee Fund Trust (CGTMSE) अंतर्गत मिळणाऱ्या सुविधा आणि Government Subsidy Schemes यांच्या बद्दल माहिती देणे हा आहे.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशीष येरेकर, सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील इतर संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. उद्योजकांना खालील जसे की एमएसएमई कर्ज सुविधा व पात्रता, पीएमईजीपी, सीएमईजीपी, मुद्रा व इतर सरकारी योजना,डिजिटल पेमेंट व Udyam Registration प्रक्रिया, Women Entrepreneurs साठी विशेष योजना, उद्योग वाढीसाठी वित्तीय साक्षरता विषयांवर मार्गदर्शन केले जाईल.

बँक अधिकाऱ्यांकडून ऑन-द-स्पॉट एमएसएमई कर्ज व कागदपत्रासंबधी मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व उद्योजक व व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून उपस्थिती नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages