नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

नवोदयच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकता समागमात ऐतिहासिक कामगिरी



व्हायोलिन वादन तसेच 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक प्राप्त

अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): पी. एम. श्री. जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथील दोन विद्यार्थ्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय बाल भवन येथे नुकत्याच झालेल्या 24 व्या राष्ट्रीय एकता समागम-2025 मध्ये विशेष कामगिरी करून जिल्ह्याचे नाव देशपातळीवर उज्ज्वल केले.

विद्यालयातील मास्टर वेदांत अथीलकर याने व्हायोलिन वादनात देशात प्रथम क्रमांक मिळवला, तर मास्टर हर्षल सोनोने याने 2-डी आर्ट मध्ये देशात पहिला क्रमांक पटकावला. याशिवाय, समूह वादन (अकेस्ट्रा) या प्रकारात मास्तर दर्शन निकोडे, जीत खवले, अर्णव बोडखे आणि आरुष पाझरे या विद्यार्थ्यांनी उपविजेता क्रमांक पटकाविला.

याप्रसंगी नवोदय विद्यालय समिती, दिल्लीचे आयुक्त राजेश लखानी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केले. नवोदय विद्यालय समितीने संपूर्ण देशातील 661 नवोदय विद्यालयांमधून विभागीय,  क्षेत्रीय आणि राष्ट्रीय स्तरावर कला, संस्कृती व संगीताशी संबंधित विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. अमरावतीच्या या विद्यार्थ्यांनी सर्व पातळ्या यशस्वीरित्या पार केल्या.  महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दादर नगर हवेली व दमण या 5 राज्यांचा समावेश असलेल्या पुणे संभागमध्ये एकूण 6 प्रथम क्रमांक पटकावले असून, त्यापैकी अमरावती नवोदयने एकट्याने 2 प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

पुणे विभागाच्या उपायुक्त श्रीमती मेरी मनी, तसेच सह उपायुक्त श्री. प्रेमकुमार यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य आर. एस. चंदनशिव, उपप्राचार्य एस. हिसवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिक्षक विनोद अथीलकर आणि कला शिक्षक एस. एन. मालवीय यांच्या प्रशिक्षणाने तसेच सर्व शिक्षकांच्या सहकार्यानेच हे यश शक्य झाल्याचे पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी सांगितले.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages