चांदुरबाजार येथील बोर्डीनाला तलावावर मच्छिमार सहकारी संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

चांदुरबाजार येथील बोर्डीनाला तलावावर मच्छिमार सहकारी संस्थांना नोंदणी करण्याचे आवाहन


अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील बोर्डीनाला मध्यम प्रकल्प (क्षेत्रफळ 152.27 हेक्टर) हा तलाव पाटबंधारे व जलसंधारण विभागाकडून आता मत्स्यव्यवसाय विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे. हा तलाव 500 हेक्टरखालील असल्याने, यावर मत्स्यव्यवसायासाठी सहकारी संस्था नोंदणी करणे आवश्यक आहे. यामुळे, तलाव परिसरातील स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त आणि मच्छिमार महिलांना संस्थेच्या माध्यमातून या तलावाचा वापर करण्याची संधी मिळणार आहे.

यासाठी, बोर्डीनाला मध्यम प्रकल्पावर संस्था नोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या स्थानिक मच्छिमार, प्रकल्पग्रस्त व मच्छिमार महिलांनी बातमी प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत संस्था नोंदणीसाठीचा प्रस्ताव सहाय्यक निबंधक, (सहकारी संस्था), अमरावती यांच्या कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त एम. एम. मेश्राम यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages