धारणी उप-जिल्हा रुग्णालयात माता आणि बालकांच्या मृत्यूच्या घटनांबाबत आरोग्य विभागाचा खुलासा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, November 20, 2025

धारणी उप-जिल्हा रुग्णालयात माता आणि बालकांच्या मृत्यूच्या घटनांबाबत आरोग्य विभागाचा खुलासा



            अमरावती, दि. २१ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): धारणी उप-जिल्हा रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या माता आणि बालकांच्या मृत्यूंच्या घटनांची गांभीर्याने दखल घेत, आरोग्य विभागाने तात्काळ प्राथमिक चौकशी पूर्ण केली आहे. या चौकशीद्वारे, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य सेवा प्रणालीतील त्रुटी आणि सुधारणा आवश्यक असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र धुळघाट रेल्वे उपकेंद्र वारा तांडा अंतर्गंत ग्रामसलाईबर्डी येथील रहिवासी असलेल्या 20 वर्षीय नर्मदा नारायण चिलावे यांना 15 नोव्हेंबर रोजी पोटदुखीमुळे धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राथमिक तपासण्या, नियमित व सामान्य होत्या. यावेळी मातेला कळा कमी असल्याने त्यांना दोन तास प्रसूती कक्षात फिरण्यास सांगितले. कळा वाढल्यावर टेबलवर घेऊन सलाईन लावण्यात आले. यावेळी प्रसुतीसाठी जोर देण्यास सांगितल्यावर मातेला अचानक झटके आले, डोळे पांढरे झाले, जीभ बाहेर आली आणि तोंडातून फेस आला. सायंकाळी 6:45 ते 7 वाजता दरम्यान मातेचा मृत्यू झाला. दाखल होताच तिला सलग झटके आल्याने तिची प्रकृती अति गंभीर झाली होती आणि प्रसूतीपूर्वीच तिचा मृत्यू झाला.

प्राथमिक आरोग्य केंद्र सादरावाडी अंतर्गंत उपकेंद्र भोकरवर्डी येथील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय कविता श्रीराम धोंडे यांची 13 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसूती कळा सुरू झाल्याने त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात आणले जात असताना, रुग्णालयाच्या आवारात सायंकाळी 6:50 वाजता त्यांची प्रसूती झाली. त्यांना 2.5 किलोग्रॅम व 2.1 किलोग्रॅम वजनाची जुळी बाळे जन्माला आली. जन्मलेल्या दोन्ही बाळांना एस.एन.सी.यु. मध्ये भरती करण्यात आले होते. परंतु, दि. 15 नोव्हेंबर रोजी एका बाळाचा मृत्यू दूध फुफ्फुसात जावून श्वसन थांबल्यामुळे झाल्याचे निदर्शनास आले.

पहिल्या बाळाच्या मृत्यूनंतर माता व दुसऱ्या बाळाला सुट्टी देण्यात आली. रुग्णवाहिकेने धुळघाटला जात असताना रुग्णवाहिकेतच दुसऱ्या बाळाचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना समजले. चौकशी व निष्कर्षानुसार, दुसऱ्या बाळाचा मृत्यू रक्तातील साखर व शरीराचे तापमान कमी झाल्यामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages