माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, November 19, 2025

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विभागीय आयुक्तालयात अभिवादन





 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ 

अमरावती, दि. 19 : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी डॉ. सिंघल यांनी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
यावेळी वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना, अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, अपर आयुक्त अजय लहाने, उपायुक्त रविंद्र हजारे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages