परशुराम पब्लिक स्कूलमध्ये अत्याधुनिक स्टीम प्रयोगशाळेचे लोकार्पण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 17, 2025

परशुराम पब्लिक स्कूलमध्ये अत्याधुनिक स्टीम प्रयोगशाळेचे लोकार्पण

 


शिरजगाव कसबा दिनांक १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

        मॅजिक पाठशाला च्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व सीएसआर विभागाच्या प्रमुख  श्रीमती प्रीतीसिंग यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण प्रयोगशाळेचे लोकार्पण करण्यात आले आहे.

    या  समारंभासोबतच शाळेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध वैज्ञानिक संकल्पना आणि मॉडेल्सचे एक विशेष विज्ञान प्रदर्शनही आयोजित करण्यात आले होते. श्रीमती प्रीती सिंग यांनी या प्रदर्शनाची  पाहणी केली. त्यांनी प्रत्येक प्रकल्पाजवळ थांबून, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्टीम प्रयोगशाळेत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचे अनुभव कसे समृद्ध झाले, याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांकडून थेट माहिती घेतली आहे.मुलांचे वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यांच्या कल्पकतेवर आधारित मॉडेल्स पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

या सोहळ्याला शाळेच्या मुख्याध्यापिका  कविता बदुकले , संचालक मयूर याउल , पालक संचालक पंकज बहेरे व  राकेश चौबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका कविता बदुकले  यांनी या प्रयोगशाळेमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान आणि कला यांचे एकत्रित ज्ञान मिळेल, अशी आशा व्यक्त केली आहे .संचालक मयूर याउल यांनी मॅजिक पाठशाला’ च्या सहकार्याबद्दल आभार मानले आहे.हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक आवड निर्माण करण्यासाठी आणि त्यांना सर्जनशीलतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी एक अविस्मरणीय दिवस ठरला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages