करजगावात १९ नोव्हेंबरला मामाच्या गावाला जाऊया अनोखा उपक्रम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, November 15, 2025

करजगावात १९ नोव्हेंबरला मामाच्या गावाला जाऊया अनोखा उपक्रम




डॉ. विजय भटकर यांच्या मुरंबा गावातील परिवाराची विशेष मुलाखत


अमरावती दि. १५ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

   जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मुरंबा (ता. मुर्तिजापूर) या जन्मगावी त्यांच्या परिवारातील सदस्याची आणि मुरंबा ग्रामपंचायत सरपंच सौ. धनश्री अखिल भटकर यांची एकत्रित मुलाखत १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

       चांदूरबाजार तालुक्यातील करजगाव येथे १९ नोव्हेंबर रोजी पार पडणाऱ्या "मामाच्या गावाला जाऊया" या अभिनव उपक्रम होणार आहे. याअनुषंगाने ही प्रेरणादायी मुलाखत आयोजित करण्यात येत आहे.विद्यार्थ्यांकडून प्रेरणादायी संवाद श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचालित बाभूळगाव-अकोला अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी ही मुलाखत घेणार आहे. विद्यार्थी विविध संस्थांचा सहकार्यपूर्ण सहभाग या भव्य सोहळ्याचे आयोजन बाभूळगाव-अकोला अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटना, दर्यापूर गाडगेोबाबा मंडळ, श्री शंकरराव शिक्षण संस्था करजगाव यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.या कार्यक्रमास स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठान, अमरावती यांचेही मौल्यवान सहयोग लाभत असल्याची माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव प्रा. डॉ. मंदार देशमुख, गाडगेबाबा मंडळ अध्यक्ष प्रा. गजानन भारसाकळे, मुरंबा सरपंच सौ. धनश्री अखिल भटकर, तसेच श्री शंकरराव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदिपंत सोनार यांनी दिली.या उपक्रमामुळे डॉ. विजय भटकर यांच्या कार्याची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचून विज्ञान, शिक्षण आणि ग्रामविकासाबद्दल  नवा वेग मिळणार आहे. या कार्यक्रमांमध्ये शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages