पदवीधर, शिक्षक मतदारयादी तयारीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Monday, November 17, 2025

पदवीधर, शिक्षक मतदारयादी तयारीचे सुधारीत वेळापत्रक जाहीर


अमरावती, दि. १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी दि. 1.11.2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदारयादी तयार करण्याचे सुधारीत वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार महत्वाच्या टप्प्यांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

मतदार नोंदणी अधिनियम, 1960 नुसार, या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार आता हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई ही दि. 28 नोव्हेंबर, 2025 पर्यंत करण्यात येणार आहे. त्यानंतर 3 डिसेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. या मतदार याद्यांवर 3 ते  18 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. दावे व हरकती 5 जानेवारी 2026 रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे आणि छपाई करण्यात येणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी 2026 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages