सोनोरी मध्ये युवा शेतकऱ्याची आत्महत्या - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 7, 2025

सोनोरी मध्ये युवा शेतकऱ्याची आत्महत्या


                                                                        किशोर अरुण तायडे

शिरजगाव कसबा दिनांक ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     जवळच असलेल्या सोनोरी गावामध्ये काल दि. ६ ला रात्री १० वाजता चे दरम्यान किशोर अरुण तायडे या युवा शेतकऱ्यांने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

घरी अत्यंत गरिबीची परिस्थिती, २ एकर शेती नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने आता पुढचे कसे होणार ही विवंचना त्यातच पत्नीला कॅन्सर झाल्यामुळे ती माहेरी गेलेली अशामध्ये किशोर अरुण तायडे (वय ३८ वर्ष) याने राहत्या घरातच गळफास  घेऊन आत्महत्या केलेली आहे. किशोरला वडील व मुलबाळ नसून आई असून ती मुलीकडे गेलेली होती शेतीचे झालेले नुकसान व पत्नीच्या आजाराचा खर्च कसा करावा या दुःखातूनच त्यांने आत्महत्या केली असावी अशी गावांमध्ये चर्चा आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages