वाहनचालकांना दिलासा! दंड आकारणीसाठी वाहतूक पोलिसांना आता 'ई-चलान मशीन'च बंधनकारक - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, October 7, 2025

वाहनचालकांना दिलासा! दंड आकारणीसाठी वाहतूक पोलिसांना आता 'ई-चलान मशीन'च बंधनकारक



 वाहतूक पोलिसांच्या खासगी मोबाईलवरील 'क्लिक'ला बंदी

मुंबई दि. ७ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क): 
    
खासगी मोबाईलमधून फोटो काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवर कारवाई होणार!

मुंबई: आता वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचे फोटो स्वतःच्या (खासगी) मोबाईलमधून काढणे वाहतूक पोलिसांना महागात पडू शकते. वाहतूक पोलिसांना आता फोटो काढून दंड आकारता येणार नाही. वाहतूक विभागाच्या अपर पोलिस महासंचालक कार्यालयाने या संदर्भात पुन्हा एकदा कडक आदेश जारी केले असून, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

म्हणजे आता पोलिसांना मलाई खाता येणार नाही.  यावर महाराष्ट्र सरकारने बंदी घातली असून, जर असे आढळल्यास संबंधित पोलिसांवर कारवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले  आहेत.

यासंदर्भात राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक यांनी परिपत्रक काढून  वाहतूक पोलीस कर्मचार्यांना सूचना दिलेल्या आहेत. . 

काय आहे नवीन आदेश?

  • वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करताना वाहतूक पोलिसांनी फक्त ई-चलान मशीनचा किंवा अधिकृत कॅमेऱ्यांचा वापर करावा.

  • कारवाई करताना पुरावा म्हणून खासगी मोबाईलमध्ये वाहनचालकांचे फोटो किंवा चित्रीकरण करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

वाहतूक पोलीस खासगी मोबाईलमध्ये नियमभंगाचे फोटो काढून ते नंतर ई-चलान सिस्टीममध्ये अपलोड करतात. यामुळे अनेकदा खालील समस्या येत होत्या:

  1. गोपनीयतेचे उल्लंघन: खासगी मोबाईलमुळे वाहनधारकांच्या गोपनीयतेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी होत्या.

  2. चुकीचे चलान: अनेकदा फक्त नंबर प्लेटचे फोटो अपलोड केल्यामुळे वाहन कोणते आहे हे ओळखण्यात अडचणी येत होत्या. तसेच, हे फोटो 'रिअल टाइम' नसल्याने चुकीचे चलान जारी होण्याची शक्यता होती.

  3. मनमानी कारभार: काही ठिकाणी वाहतूक पोलीस मनमानी पद्धतीने खासगी मोबाईलचा वापर करून कारवाई करत असल्याच्या तक्रारी होत्या.

आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, यापुढे सर्व दंडात्मक कारवाई अधिकृत कॅमेऱ्यांद्वारे आणि ई-चलान मशीनद्वारेच केली जावी. तसेच, जर एखाद्या वाहतूक पोलिसांनी खासगी मोबाईलचा वापर करून दंडात्मक कारवाई केल्यास, त्यांच्यावर तत्काळ शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल.

राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांना हे आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages