· ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
अमरावती, दि. १८ : समाज कल्याण विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 करीता अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर श्रेणीतील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दि
या योजनेंतर्गत परदेशात शिक्षण घेऊन पदव्युत्तर पदवी किंवा पीएच.डी. अभ्यासक्रमांचे उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक स्थिती सुधारते. या योजनेअंतर्गत दरवर्षी एकूण 125 जागा दिल्या जातात, त्यापैकी 115 जागा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी, 6 जागा विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींसाठी आणि 4 जागा भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवारांसाठी राखीव आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://
पात्रता : या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जाती, विमुक्त, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपारिक कारागीर उमेदवार असावा. भारताचा रहिवासी असावा, वयोमर्यादा 35 वर्ष, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे. पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परिक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परिक्षेत किमान 60 टक्के गुण असणे आवश्यक. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत 500 च्या आत असावी.
लाभाचे स्वरुप : या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण फीची पूर्ण रक्कम देय राहील. त्यात आरोग्य विमा (Health Insurance) आणि (ग) व्हिसा शूल्क (Visa Fees) इ. बाबी परदेश शिष्यवृत्ती धारकासाठी अनुज्ञेय असतील. विद्यार्थ्याना वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासाठी यु एस. डॉलर USD १५,४०० तर यू. के. साठी जी.बी. पौड GBP ९,९०० इतका अदा करण्यात येईल. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यु एस. ए. व इतर देशांसाठी यु. एस. डॉलर. USD१,५०० तर यु. के. साठी जी.बी. पौड GBP १,१०० इतके देण्यात येईल. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश राहील. विद्यार्थ्यांस परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत देताना विभाग प्रवासाचा खर्च अनुज्ञेय असेल. Application Form - या योजनेसाठी www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरुन अर्जाचा नमुना Online उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी तसेच केवळ योजनेशी संबंधित प्रश्नांबाबत मार्गदर्शनाासाठी योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्री भवन डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, नवी दिल्ली-११०००१ फोनः ०११ २३३८४०२३ यावर संपर्क साधवा. (सर्व कामकाजाचे दिवस दुपारी ३ ते संध्याकाळी ५ पर्यंत) ईमेल: ५०- s-msje[at]gov[dot]in कोणत्याही तांत्रिक मदतीसाठी कृपया ईमेल करा: dev2-nha [at] supportgov[dot]in अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या https//nosmsje.gov.in/nosmsje/
Post a Comment
0 Comments