इयत्ता दहावीव बारावीच्या संस्थांना शिक्षण मंडळाप्रमाणे समकक्षतेबाबत सूचना जारी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, October 17, 2025

इयत्ता दहावीव बारावीच्या संस्थांना शिक्षण मंडळाप्रमाणे समकक्षतेबाबत सूचना जारी

·        यादी www.mahahsscboard.in संकेतस्थळावर उपलब्ध

 

अमरावती, दि. १८ : महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याव्दारे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेतल्या जाते. या मंडळाप्रमाणेच समकक्षतेबाबत मान्यता देण्यात आलेल्या संस्था, बोर्ड यांची मान्यताप्राप्त यादी मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याची सर्व संबंधित मान्यताप्राप्त शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळ, पुणेचे सचिव देविदास कुलाळ यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे ही एक स्वायत्त संस्था असून याव्दारे इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जातात. महाराष्ट्र राज्याच्या या बोर्डाकडे समकक्षता मिळण्यासाठी इतर संस्था, बोर्ड प्रस्ताव सादर करतात. सदर प्रस्तावांची पडताळणी करुन संबंधित संस्था, बोर्ड यांना इयत्ता दहावी व बारावी समकक्षतेबाबत मान्यता प्रदान करण्यात येते. उपरोक्तप्रमाणे समकक्षतेबाबत मान्यता देण्यात आलेल्या संस्था/बोर्ड यांची यादी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहिर करण्यात आली आहे, असेही मंडळाव्दारे कळविण्यात आले आहे.

 


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages