वेस्टर्न व्होकल सोलो प्रकारात वेदश्री राज्यातून प्रथम - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, October 18, 2025

वेस्टर्न व्होकल सोलो प्रकारात वेदश्री राज्यातून प्रथम

 

• नाशिक विद्यापीठात कलर कोट पटकावला



चांदूरबाजार दिनांक १८ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

     रिध्दपूर येथील कु. वेदश्री सुनील गवळी हीने पाश्चिमात्य एकल गायन स्पर्धेत सहभागी होऊन राज्यातून प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला असल्याने तिच्या या यशामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

    यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक द्वारा आयोजित युवक महोत्सवात राज्यातील आठही विभागांतर्गत महाविद्यालयीन गायक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता. 

  महाराष्ट्र राज्यातील अमरावती, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, संभाजीनगर, पूणे, मुंबई व कोकण या आठ विभागातील सहभागी कलाकारांमधून कु. वेदश्री प्रशांत गवळी हीची इंग्रजी पाश्चात्य गीतगायनातून नाशिक येथील दिग्गज कलाकारांनी निवड केली आहे .

     युवक महोत्सव २०२५ मध्ये निवड झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिकचे कुलगुरू प्रा संजय सोनवणे तथा प्र-कुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांचे हस्ते पारितोषिक व कलर कोट देण्यात आला. वेदश्रीला साथीदार म्हणून अनिल अढाळगे व तेजस विजय स्वर्गे यांची साथ लाभली.

    रिध्दपूर सह जिल्ह्याची मान उंचावली गेली असल्याचा आनंद ग्रामवाशियांना झाला असून जिल्हा परिषदेचे माजी सभापती तात्या मेश्राम, मोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती द्वय सुनील कडू व रमेश खातदेव, सभापती शंकर उईके यासह असंख्य मान्यवरांनी वेदश्री चे अभिनंदन केले आहे.

• आई- वडील व गुरूजनांमुळे हे शक्य - वेदश्री

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना वेदश्री सांगते की, माझ्या उपजत कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यात माझी आई सीमा व वडिल सदैव माझ्या पाठीशी उभे राहिले. तसेच गुरूजनांनी योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळेच मी हे यश प्राप्त करू शकले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages