शुक्रवारी ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, October 23, 2025

शुक्रवारी ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर

अमरावती, दि. २३ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) : ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाली नसलेल्या आर्थिक मालमत्तांच्या निकालीकरणासाठी शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता विशेष जिल्हास्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुख्य इमारतीत हे शिबिर होणार आहे.

शिबिरात खातेदारांच्या दावा न केलेल्या ठेवींचे निराकरण करणे तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व बँका या शिबिरात सहभागी होणार आहेत. ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत सर्व नामनिर्देशित, पात्र लाभार्थ्यांनी या शिबिरास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

वित्तीय सेवा विभाग आणि राज्यस्तरीय बँकर्स समिती यांच्या निर्देशानुसार हे शिबिर होत आहे. या उपक्रमामुळे खातेदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवी परत मिळवण्याची संधी मिळणार आहे. 10 वर्षांहून अधिक काळ ज्या ठेवींवर दावा केलेला नाही, अशा ठेवी 'ठेवीदार शिक्षण व जागरूकता निधी'मध्ये हस्तांतरित करण्यात येतात. खातेदारांना त्या परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages