* प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरजगाव कसबा यांच्या माध्यामातून शिबीर आयोजीत *
🙏श्रीगणेशा आरोग्याचा🙏
प्रतिनीधी: चंदन धाकडे दि. ५/९/२०२५
भारत सरकारने आखलेल्या कल्याणकारी आरोग्य धोरणात सर्व जनसमुदायाचे आरोग्य निरोगी व सुंदर राहावे याकरीता केंद्र व राज्य सरकारने मुख्यमंत्री सचिवालयातून मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मदाय रूग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने शिरजगाव कसबा येथील नागरिकांना आपल्या आरोग्याबद्दल काही समस्या असल्यास 'श्रीगणेशा आरोग्याचा' असे आरोग्य अभियान राबविण्यात आले यामध्ये शिबीरात उपस्थित तज्ञ डॉक्टर, जनरल मेडीसीन, जनरल सर्जरी, अस्थिर विकार, बालरोग तज्ञ, हृदयविकार तज्ञ, नेत्रविकार तज्ञ, त्वचाविकार तज्ञ, स्त्रि रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, कॅन्सर तज्ञ यांच्यामार्फत आवश्यक त्या सुविधा नागरिकांना पुरविण्यात आलेल्या आहेत. तसेच विनामुल्य तज्ञ डॉक्टरांकडून रोग निदान, शिबीरानंतर आवश्यक शस्त्रक्रिया, रक्त व लघवी चाचणी व ई.सी.जी. तपासणी करण्यात आलेली आहे. शिबीराचे आयोजन सुर्यवंशी गणेश उत्सव मंडळ, बारगणपुरा व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरजगाव कसबा यांनी केले असुन या आरोग्य अभियानात एकुण २०६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली
शिबीराला गावकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आरोग्य अभियान यशस्वी करण्याकरीता तज्ञ डॉ. ललीत चव्हाण (छातीरोग तज्ञ), डॉ. रणजित चित्रकार (दंत्तरोग तज्ञ), डॉ. वेंदात सर (डोळे तज्ञ) डॉ. अनघा खुळे, वैद्यकिय अधिकारी, डॉ. राहुल धसकट, डॉ. वृंदा चित्रकार, कल्पना चिठोरे, सिमा उके, पुजा दरवार, श्रीव्हान ढोणे, राहुल खेळकर, दहिकर, उमेश उमाळे, गजानन शहाणे, पवन धोटे, वाहनचालक, परिचर, इतर पदाधिकारी तसेच गावातील माधुरी टिंगणे, वंदना पारधी, अर्चना भडके, टाकरखेडे, भडके, योगीता वाढोकर, वच्छला चव्हाण, आशावर्कर, तसेच सुर्यवशी गणेशमंडळातील अध्यक्ष अमोल केदार व सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले
Post a Comment
0 Comments