शिरजगावात पाहुणा आलेला युवकाचा मेघा नदी पात्रात बुडून मृत्यू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 4, 2025

शिरजगावात पाहुणा आलेला युवकाचा मेघा नदी पात्रात बुडून मृत्यू

 


शिरजगाव कसबा  दिनांक ५  ( ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

    पोलीस स्टेशन शिरजगांव कसबाचे हद्दीतील मेघा नदी चे पात्रातील बंधाऱ्यात मल्हार येथील युवक  श्रावण ऊर्फ गणपत गोरख सुवारे वय १७ रा. मल्हारा ता अचलपूर जि अमरावती पोहत असताना  पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. 

      मृत युवक श्रावण सुवारे त्याचे नातेवाईक मावसा - गोपाल बावणे रा. मानकरपुरा शिरजगांव कसबा यांचे घरी महालक्ष्मी चे कार्यक्रमसाठी आला असता  मावस भाऊ यश बावणे व  इतर मित्रा सोबत पोहण्यासाठी गेला असता बंधाऱ्या जवळ भोवऱ्याचे ठिकाणी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मरण पावला आहे. नमूद मयतास प्राथमिक आरोग्य केंद्र शिरजगांव कसबा येथे नेण्यात आले होते तेथुन पोस्टमार्टम  साठी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे नेण्यात येऊन अंत्यविधी उरकण्यात आला आहे.पुढील कारवाई पोलीस स्टेशन शिरजगांव कसबा करीत आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages