शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षेची गुणयादी जाहीर - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 5, 2025

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षेची गुणयादी जाहीर

 अमरावती दि. ५ : शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षा २०२५ मे व जून महिन्यात घेण्यात आली असून त्या सदर परीक्षेचा निकाल १८ ऑगस्ट रोजी www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार गुणयादी (स्कोर लिस्ट) महाराष्ट्र राज्य परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे, असे आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

            शासनाद्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) परीक्षा २०२५ चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने दि. २७ मे ते ३० मे २०२५ व दि. २ जून २०२५ ते ५ जून या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यामध्ये एकूण 60  परीक्षा केंद्रावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ८ दिवसांमध्ये प्रतिदिन तीन सत्रात घेण्यात आली होती. सदर परीक्षेत एकूण 228808 परीक्षार्थी/उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी परीक्षेत एकूण 211308 प्रविष्ट झाले होते.

            या परीक्षेचा निकाल दि. १८ ऑगस्ट २०२५ रोजी गुणयादी व गुणपत्रक (स्कोर लिस्ट आणि स्कोर कार्ड) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच राखीव ठेवण्यात आलेल्या बी.एड व डी.एल.एड परीक्षेचे एकूण ६३२० प्रविष्ट (अपियर) विद्यार्थी/उमेदवारांपैकी २७८९ विद्यार्थी/उमेदवारांचा निकाल दि. २५ ऑगस्ट २०२५ प्रसिद्ध करण्यात आला आहे. असेही विभागाद्वारे कळविण्यात आले आहे.

                                                                        *****

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages