भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवाडा निमित्ताने जय भवानी दुर्गोत्सव मंडळात रक्तदान शिबिर संपन्न - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, September 28, 2025

भारतीय जनता पार्टी सेवा पंधरवाडा निमित्ताने जय भवानी दुर्गोत्सव मंडळात रक्तदान शिबिर संपन्न



शिरजगाव कसबा दिनांक २९ डींगाबर सुने (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर  शास्त्री यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर पर्यंत भारतीय जनता पार्टीने सेवा पंधरवडा लोकहिताचे कार्यक्रम संपन्न करण्याचे ठरविल्याने येथील कार्तिक स्वामी बहुउद्देशीय मंडळ व जय भवानी दुर्गोत्सव मंडळ तथा भारतीय जनता पार्टी चे संयुक्त विद्यमाने खडकारिपुरा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले आहे.

 कार्यक्रमाचे अध्यक्ष अचलपूर मतदार संघाचे आमदार प्रवीण तायडे होते तर प्रमुख अतिथी मुरली माकोडे जिल्हा उपाध्यक्ष, मनोहर सुने माजी जि प सभापती, बाळासाहेब सोनार जिल्हा कार्यकारणी सदस्य, हर्षल धुळे तालुकाध्यक्ष, साहेबराव अस्वार, नितीन टींगने, मिलिंद चुके,सौ. नीलिमा निमकर, संजय कोसे, प्रदीप पंडागळे, वैभव दाभाडे उपस्थित होते. 

या कार्यक्रमांमध्ये आमदार प्रवीण तायडे यांचा दुर्गोत्सव मंडळाचे वतीने सत्कार करण्यात आला आहे.

रक्तदान शिबिरामध्ये पोलीस स्टेशन व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

 रक्तदान शिबिरामध्ये ठाणेदार महेंद्र गवई, महिला पो. कॉ. ऋतुजा गांडीलकर, सौ. प्रियंका राहुल राजस, सौ. वंदना साहेबराव अस्वार,सौ.रेखा संजय तिखीले, सौ. कांचन प्रशांत  राजस याच्यासह  ४०  युवकांनी रक्तदान केले आहे.

रक्तदान शिबिराचे कार्य डॉ. निलेश काकड यांचे मेळघाट ब्लड बँक सेंटर परतवाडा यांनी पाहिले आहे.

रक्तदात्यांना मंडळ व मेळघाट ब्लड बँक वतीने प्रमाणपत्र चे वाटप करण्यात आले आहे.

रक्तदान शिबिराचे व्यवस्थापन कार्तिक स्वामी बहुउद्देशीय मंडळ व जय भवानी दुर्गोत्सव मंडळाचे रामकृष्ण राजस ,अशोक रेखाते, अंकुश बदुकले, रोशन पाटील ,मनोज राजस, हरीश दाभाडे ,वैभव दुधे, प्रवीण गुर्जर व मंडळ कार्यकारिणीने  केले आहे.


 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages