ग्रामीण उदय स्त्री शक्ती जागर - नवरात्रोत्सवानिमित्ताने सन्मान नवदुर्गांचा ... - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, September 28, 2025

ग्रामीण उदय स्त्री शक्ती जागर - नवरात्रोत्सवानिमित्ताने सन्मान नवदुर्गांचा ...




स्वतःच्या अस्तित्वालाही महत्त्व द्या - कंचनताई मुरके यांचे आवाहन


अमरावती : दिनांक २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क)

      अनेकदा महिला अंधश्रद्धा पसरवतात, तर त्या स्वतःच अंधश्रद्धांचे बळी ठरतात 

आरोग्य आणि शिक्षण: अंधश्रद्धांमुळे स्त्रियांच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक असल्याचे मत त्यांनी एकता नवदुर्गा महिला मंडळाच्या वतीने आयोजित सन्मान नवदुर्गांचा कार्यक्रमात मांडले पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,महिलांनो स्वतःला ओळखण्यासाठी स्वतःच्या क्षमतांना सामोरे जाणे, कुटुंबासाठी आणि समाजासाठीच्या जबाबदाऱ्यांइतकेच स्वतःच्या अस्तित्वालाही महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यांना स्वतःचे ध्येय, आवड आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. यासाठी आत्म-जागरूकता, आत्म-स्वीकृती आणि स्व-निर्णयाची गरज आहे, जेणेकरून त्या स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण करू शकतील आणि समाजात आपले स्थान ठामपणे मांडू शकतील.

नऊ नवरात्रोत्सवाच्या नऊ दिनी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या नवदुर्गांचा हा सन्मान सोहळा म्हणजे एक आगळावेगळा उपक्रम महिला भगिनींनी घेतला आहे.अलका प्रतीन सोरटे पाटबंधारे विभाग अधिकारी, अर्चना भोजने दिव्यांग,ज्योती निंबोरकर उद्योजिका, वैष्णवी दिपक तांडे फुलबाग शेती,कंचन मुरके लेखिका व पत्रकार यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमात .सुषमा बर्वे,रंजना ताई गोहत्रे,कल्पना ढोके,हर्षा पाटिल(सुने), सुजाता ढोके, अस्मिता माहुरकर,जया भस्मे, हर्षाली बोळंके,उषाताई सातपुते,कीरण भुते(सुने),स्वीटि कुलथे , मनिषा बलींगे,कीरण काळे,बेबीताई कोंडे,सविता साबे ,ममता ताथोड,धर्माळे काकु,कीरण देशमुखसुनिता मानकर,ऊर्मिला डंडाळे,सई.वानखडे, सुनिता मुदळकर,वर्षा पोहत्रे यांसह परिसरातील महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages