राज्यातील धार्मिक संस्थानांची शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Sunday, September 28, 2025

राज्यातील धार्मिक संस्थानांची शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये मदत


                      




                 


मुंबई दिनांक २९ (ग्रामीण उदय न्यूज नेटवर्क) 

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यात पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाकडून मदतीचे आवाहन  करण्यात आले आहे. त्यास अनुसरून राज्यात पुरामुळे बाधित झालेल्या पूर पिडीतासाठी व शेतकऱ्यांसाठी सर्वप्रथम श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे वतीने मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये १कोटी ११ लाखाचा निधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना धनादेशाद्वारे देण्यात आलेला आहे.

यानंतर तुळजामाता संस्थान तुळजापूर  १ कोटी रुपये, साईबाबा संस्थान शिर्डी १ कोटी रुपये व विठ्ठल रुक्मिणी संस्थान पंढरपूर १ कोटी रुपये यांनी ही मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये निधी पाठविला आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages