मेळघाटातील आरोग्य सेवेसाठी'स्कॉच अवॉर्ड - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

मेळघाटातील आरोग्य सेवेसाठी'स्कॉच अवॉर्ड



अमरावती, दि. 25 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : मेळघाटातील आरोग्य सेवेसाठी अमरावती जिल्हा परिषदेला 'स्कॉच अवॉर्ड 'ने सन्मानित करण्यात आले आहे. मेळघाटातील कुपोषण, माता आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने 'मिशन 28' हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला आहे.

जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडा यांनी 2021 मध्ये 'मिशन 28' ची संकल्पना मांडली होती. सध्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे आणि डॉ. श्रीमती वानखेडे यांच्यासह मेळघाटातील संपूर्ण टीमने या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

या पुरस्कार सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे अधिकारी, जिल्हा लेखा व्यवस्थापक अशोक कोठारी, आरोग्य सेविका विद्या गावंडे आणि आशा कार्यकर्ता अनिता धुर्वे यांच्यासह मेळघाटातील अंगणवाडी कार्यकर्ते टीम उपस्थित होती. डॉ. सुरेश असोले यांनी या यशाचे श्रेय मेळघाटातील आरोग्य टीम, आशा वर्कर, डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना दिले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages