पिंक ई-रिक्षाने दिले नवे जीवन: सुषमा गायकवाड यांची संघर्षगाथा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Wednesday, September 24, 2025

पिंक ई-रिक्षाने दिले नवे जीवन: सुषमा गायकवाड यांची संघर्षगाथा

  


अमरावती दि. 25 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) :
जिल्ह्यातील पिंक ई-रिक्षाच्या प्रथम लाभार्थी सुषमा धीरज गायकवाड यांना पतीच्या निधनानंतर संघर्षाचा सामना करावा लागला. पतीच्या निधनानंतर त्यांची परिस्थिती खूपच कठीण झाली होती. त्यांनी 4 व 6 वर्षे वयाच्या मुलींच्या संगोपनासाठी आणि स्वतः जीवनात पुन्हा उभे राहण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, अमरावती मधून पिंक ई-रिक्क्षाचा अर्ज भरला. त्या प्रक्रियेतून त्यांना  ई-रिक्क्षा मिळाली. ज्यामुळे त्यांना रोजगार मिळाला. आता त्या दिवसाला साधारणपणे 800 ते 900 रुपये कमावतात. त्या दिवसाला सुमारे 70 ते 80 किलोमीटर प्रवास करतात. आज त्या सक्षमपणे आपल्या दोन्ही मुलींना सांभाळीत आहे.

 काही वर्षांपूर्वी स्त्रियांना घराबाहेर पडून सुरक्षित प्रवास करणे मोठे आव्हान होते. अशा वेळी पिंक ई-रिक्क्षा योजना सुरू झाली. ही ई-रिक्क्षा फक्त स्त्रियांसाठी असून, त्याचे चालकही महिला आहेत.

   या उपक्रमामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आणि त्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास जागा झाला.  या महिला वाहन चालकांनी गाडी चालविण्यापासून ते लोकांचा प्रवास सुरक्षित करण्यापर्यंत त्या कुणाच्याही मागे नाहीत, हे सिद्ध केले. आज पिंक ई-रिक्क्षा प्रवासाचे साधन नाही तर महिला सक्षमीकरणाचे प्रतीक बनले आहे.

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages