Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

अमरावती शहरात ५ सप्टेंबर रोजी वाहतूक नियमांमध्ये बदल

 

अमरावती, दि. ५ : अमरावती शहरात शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यासाठी पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी अधिसूचना जारी केली आहे.

 ट्रान्सपोर्ट नगर ते नागपुरी गेट चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांसाठी वाहतूक एका बाजूने (वन-वे) सुरू राहील.

चित्रा चौक ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतुक प्रभात टॉकीज व दिपक चौकमार्गे वळविण्यात येतील.

हनुमान नगर पोलीस चौकी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात सर्व जड वाहनांना प्रवेश बंद राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक महाजनपुरा मार्गे वळवण्यात येईल.

जवाहर गेट ते टांगा पडाव: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंदी राहील. इतर हलक्या वाहनांची वाहतूक सराफा-गांधी चौक-जयस्तंभ मार्गे वळवण्यात येईल.

 लालखडी ते पठाण चौक: या मार्गावर मिरवणुक काळात जड वाहनांना प्रवेश बंद असून इतर हलक्या वाहनांची वाहतूक लालखडी रिंग रोड मार्गे वळवण्यात येतील.

या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक, वाहनधारकांवर मोटर वाहन अधिनियम १९८८ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी या कालावधीत सहकार्य करावे आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


Tags

Post a Comment

0 Comments