मराठी भाषा विद्यापीठाचा आप पहिला वर्धापन दिन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Friday, September 5, 2025

मराठी भाषा विद्यापीठाचा आप पहिला वर्धापन दिन

 

 

 

अमरावती, दि. ५ : रिद्धपूर येथे स्थापन केलेल्या मराठी भाषा विद्यापीठाचा पहिला वर्धापन दिन शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात साजरा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर भूषवणार आहेत.

 

यावेळी आचार्य श्री. करंजेकर बाबा, डॉ. गिरीश गांधी, खासदार डॉ. अनिल बोंडे, बळवंत वानखेडे, अमर काळे आणि आमदार चंदू यावलकर उपस्थित राहणार आहेत.

 

या सोहळ्यात विद्यापीठातर्फे देण्यात येणारे दोन प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि व्याकरणकार प्रा. यास्मीन शेख यांना पहिला 'मराठी भाषा गौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते अशोक आणि ज्योती काकडे यांना 'समाजभूषण गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.



Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages