राजा राममोहन रॉय ग्रंथभेट योजना: निवडलेल्या ग्रंथांवरील हरकतींसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 30, 2025

राजा राममोहन रॉय ग्रंथभेट योजना: निवडलेल्या ग्रंथांवरील हरकतींसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदत

 


            अमरावती, दि. 01 (ग्रामीण उदय प्रतिनिधी ): राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या 50 व्या ग्रंथभेट योजनेंतर्गत निवड झालेल्या 1 हजार 388 ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाने प्रसिद्ध केली आहे. सन 2023 मध्ये प्रकाशित व संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमितीने ही निवड केली आहे. यामध्ये मराठी (749), हिंदी (297) आणि इंग्रजी (342) ग्रंथांचा समावेश आहे. ही यादी ग्रंथालय संचालनालयाच्या www.dol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 15 ऑक्टोबर 2025 या कालावधीत अवलोकनार्थ खुली ठेवण्यात आली आहे. या ग्रंथयादीतील ग्रंथ किमान 25 टक्के सूटदराने वितरित करणे बंधनकारक आहे. या यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना, हरकती किंवा आक्षेप असल्यास, ते दि. 15 ऑक्टोबर 2025 पर्यंत ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नगर भवन, मुंबई- ४०० ००१ यांच्याकडे लेखी स्वरुपात कार्यालयीन वेळेत हस्तबटवड्याने वा पोस्टाने अथवा उपरोक्त नमूद केलेल्या ई-मेलवर पाठवावेत. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या सूचनांचा, हरकतींचा किंवा आक्षेपांचा विचार केला जाणार नाही. यादीत ग्रंथांचे नाव, लेखक, प्रकाशक व किंमत यामध्ये काही बदल असल्याचे निदर्शनास आणून दिल्यास स्वागतार्ह असेल, असे आवाहन प्र. ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages