नैसर्गिक आपत्ती मदतीतून कर्जवसुली करू नका! बँकांना जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट निर्देश - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 30, 2025

नैसर्गिक आपत्ती मदतीतून कर्जवसुली करू नका! बँकांना जिल्हा प्रशासनाचे स्पष्ट निर्देश


            अमरावती, दि. 01 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व इतर नुकसानीपोटी राज्य शासनाकडून बाधितांना देण्यात आलेल्या मदतीमधून कोणत्याही कर्ज खात्यात वसुली करण्यात येऊ नये, असे स्पष्ट आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व बँकांना केले आहे.

शासनाकडून वेळोवेळी आदेश निर्गमित करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत जमा केली जाते. मात्र, काही बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम या मदतीच्या रकमेतून परस्पर वसूल केल्याचे निदर्शनास आले आहे.

या गंभीर बाबीची नोंद घेत, गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी वाटप केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करताना, मदतीच्या रकमेमधून कोणत्याही प्रकारची वसुली बँकांनी शेतकऱ्यांच्या कुठल्याही कर्ज खात्यामध्ये करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले आहे. या संदर्भात कोणत्याही अडचणी किंवा तक्रारी असल्यास, 9923844044 किंवा 9970709824 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आवाहन  प्रशसनामार्फत करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात मिळालेली ही मदत शेतकऱ्यांसाठी दिलासा असल्याने, ती पूर्णपणे त्यांच्या उपयोगासाठी उपलब्ध राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages