अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योजकांना व्याज परताव्यासोबतच मिळणार व्यवसाय प्रशिक्षण - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 30, 2025

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योजकांना व्याज परताव्यासोबतच मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

            अमरावती, दि. 01 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी कार्यरत असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळने आता केवळ बँक कर्जावरील व्याज परतावा योजनाच नाही, तर लाभार्थ्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण व मेंटॉरशिप देखील देण्यात येणार आहे. हा निर्णय तरुण उद्योजकांना आर्थिक मदतीसह त्यांना व्यवसाय यशस्वीपणे चालवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये मिळवून देण्याच्या उद्देशाने घेण्यात आला असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांनी दिली आहे.

महामंडळाच्या वतीने त्वरीत कार्यवाही सुरु करुन, 'उद्योग-सारथी' प्रशिक्षण नुकतेच ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. या वेबिनारमध्ये राज्यभरातील इच्छुक लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय या महत्त्वपूर्ण विषयावर पुणे कृषी विद्यालयाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी मार्गदर्शन केले. हे वेबिनार युट्यूब समवेत फेसबुकवर देखील लाईव्ह स्वरुपात दाखविण्यात आले होते. यावेळी डॉ. माने यांनी दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक बाबींवर प्रकाश टाकला. यामध्ये उत्तम जातीच्या जनावरांची निवड (उदा. गीर, साहिवाल, जर्सी), जनावरांच्या आरोग्यासाठी आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी संतुलित आहार (हिरवा व सुका चारा, आवश्यक खनिज मिश्रणे), तसेच जनावरांना होणारे आजार, प्रतिबंधात्मक उपाययोजना, वेळोवेळी लसीकरण आणि स्वच्छतेचे नियम याबद्दल सखोल माहिती दिली.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages