डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य तपासणी - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 30, 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात ज्येष्ठ नागरिकांसाठी आज मोफत आरोग्य तपासणी

            अमरावती, दि. 0१ (ग्रामीण उदय प्रतिनिधी): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत , आज, १ ऑक्टोबर २०२५ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्तालयाच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे आयोजन करण्यात आले आहे.

या आरोग्य तपासणी शिबीरासाठी जिल्हा शल्य चिकित्सक रूग्णालय, अमरावती यांच्या वैद्यकीय चमू मार्फत नेत्ररोगतज्ज्ञ, दंतरोगतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मेडिसिन, बी. पी. मधुमेह इत्यादी तपासणी करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या बिगर सरकारी संस्थांचा सत्कार, गौरव, आरोग्य शिबिर, चर्चासत्र, परिसंवाद या सारख्या विविध कार्यक्रमांचे आयोजन समाज कल्याणच्या वतीने करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी कायदे व योजनाविषयक बाबींची माहिती, वृध्दांचे हक्क, ज्येष्ठ नागरिकांना देणात येणाऱ्या सोयी-सुविधा, इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांसाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.

तरी या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिर,स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सीपी ऑफीसच्या मागे, चांदूर रेल्वे रोड, अमरावती येथे आज , दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहून आपली  वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राजेंद्र जाधवर यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages