खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण: - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 18, 2025

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी मोफत प्रशिक्षण:


अमृत आणि एमसीईडीचा संयुक्त उपक्रम

 

अमरावती, दि. 18 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दोन महत्त्वपूर्ण मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नवउद्योजक, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रेरित करणे आहे.

 

पहिला कार्यक्रम 18 दिवसांचा अन्न व फळ प्रक्रिया निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण असून, दुसरा 30 दिवसांचा AI तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या दोन्ही प्रशिक्षणांमध्ये मोफत शिक्षण, अनुदान, आर्थिक सहाय्य आणि उद्योजकता विकासासाठी मार्गदर्शन पुरवले जाईल. याव्यतिरिक्त, 'अमृत' व्याज परतावा योजनेबाबतही सखोल माहिती दिली जाणार आहे.

 

या प्रशिक्षणासाठी 18 ते 60 वयोगटातील उमेदवार पात्र आहेत. विशेषतः ब्राह्मण, कायस्थ, ठाकूर, मारवाडी, गुजराती, जाट, राजपूत यांसारख्या अमृत लक्षित गटातील खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे केली जाईल.

 

या संदर्भात एक दिवसीय परिचय मेळावा आणि मुलाखत 26 सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी 12 ते 3 या वेळेत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पहिला माळा, टांक चेंबर्स बिल्डिंग, गाडगेनगर, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह (टी.सी., मार्कशीट, पॅन कार्ड, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाइल, फोटो इत्यादी) मुलाखतीस उपस्थित राहावे.

 

नोंदणी करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी  स्वप्नील इसळ (८७८८६०४२२६), राजेश सुने (९१६८६६७१५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना अमरावती जिल्ह्यातील रोजगार व स्वयंरोजगारासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.

            ***

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages