रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग; - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Thursday, September 18, 2025

रोजगार मेळाव्यात १२८ तरुणांचा सहभाग;


38 जणांची प्राथमिक निवड

 

अमरावती, दि. 18 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडेल करिअर सेंटर, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या 'प्लेसमेंट ड्राईव्ह' ला तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अमरावती शहर आणि परिसरातील विविध तालुक्यांमधून तब्बल 128 उमेदवारांनी मेळाव्यात सहभाग घेतला.

 

या मेळाव्यात दहावी, बारावी, पदविकाधारक, पदवीधर तसेच तांत्रिक शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संधी मिळावी यासाठी पाच नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये कोल्ब्रो ग्रुप, सहयोग मल्टी बँक, कोअर प्रोजेक्ट, स्विगी आणि जाधव गियर्स या कंपन्यांचा समावेश होता. या कंपन्यांनी 82 विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या.

 

उपस्थित 125 उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊन जागेवरच निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यातून 38 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, 4  उमेदवारांची अंतिम निवड लगेचच जाहीर करण्यात आली. त्यामुळे तरुणांना कंपन्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली.

 

या मेळाव्याच्या यशामुळे जिल्ह्यातील तरुणांना आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे, असे मत कौशल्य विकास केंद्राचे अधिकारी अभिषेक ठाकरे यांनी व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वैष्णवी कुयरे यांनी तर क्रपा अरगुर्लेवार यांनी आभार मानले.

**

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages