Type Here to Get Search Results !

Gramin Uday Logo

Gramin Uday Logo

सण उत्सव कालावधीत शहरामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू


अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36 नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले आहे.

या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 5 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी दिले आहे.

0000

Post a Comment

0 Comments