सण उत्सव कालावधीत जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 23, 2025

सण उत्सव कालावधीत जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू


अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): जिल्ह्यात आगामी काळात सण उत्सव साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता व व्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधिनियमांतर्गत कलम 36नुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू झाले आहे.

शहरात नवदुर्गोत्सव, शारदोत्सव तसेच नवरात्री उत्सवास प्रारंभ झाला आहे. यात दुर्गादेवी व शारदादेवींची मोठ्या प्रमाणात स्थापना करण्यात आली आहे. तसेच अंबादेवी, एकविरादेवी मंदिर परिसरात भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज भाविकांची विशेषत: महिला वर्गाची प्रचंड गर्दी राहते. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 36 नुसार सर्व पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील सर्व पोलिस ठाणेदार, अंमलदार व त्यांच्यावरील अधिकाऱ्यांना दि. 22 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर 2025च्या मध्यरात्रीपर्यंत अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहे.

रस्त्यावरून जाणारी मिरवणूक सुरळीत ठेवणे, उपासनास्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळ्याचा संभव असेल तर अडथळा होऊ न देणे, सर्व मिरवणूकाच्या व जमावाच्या प्रसंगी व पूजा-अर्चा या ठिकाणी कोणताही रस्ता किंवा अडथळा संभव असेल अशा सर्व बाबतीत अडथळा न होवू देण्यासाठी याठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सर्व रस्त्यांवर किंवा रस्त्यात, सर्व धाब्यावर आणि सार्वजनिक ठिकाणच्या कपडे धुण्याचा व उतरविण्याचा जागेच्या ठिकाणी व इतर सर्व सार्वजनिक किंवा लोकांच्या येण्याच्या जागेमध्ये बंदोबस्त राहण्यासाठी, वाद्यांबाबत नियम व नियंत्रण ठेवणे, सार्वजनिक जागेत ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत नियम व नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. यासाठी हे आदेश देण्यात आले आहे.

0000

 

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages