अमरावती, दि. 24 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांनी सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी धानोरा म्हाली, ता. चांदूर रेल्वे येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुमन मारबदे यांच्या घरी भेट दिली.
अॅड. निलेश हेलोंडे पाटील यांनी चांदूर रेल्वे येथे शेतकरी आत्महत्याबाबत तहसिल कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी तहसिलदार पुजा माटोडे, गटविकास अधिकारी संजय खारकर, तालुका कृषी अधिकारी संचित ढाकरे आदी उपस्थित होते.
बैठकीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना संगायो योजना, पुरवठामधील योजनेसह चांदूर रेल्वे तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेले शेतीचे नुकसान आणि इतर नुकसानीचा आढावा घेतला. तसेच पंचायत समितीच्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. कृषी विभागामार्फत कुरण विकास अंतर्गत कुरण लागवडीबाबत आढावा घेवून कार्यवाही करण्याची सूचना देण्यात आली. त्याचप्रमाणे पशूसंवर्धन विभागाच्या पशुधन विकास योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. बालविकास अधिकारी यांच्याकडून बालसंगोपन व इतर योजनांची विस्तृत माहिती घेतली. त्यानंतर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब सुमन मारबदे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.
00000