प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय कर्मचारी एकतेचा विजय - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Tuesday, September 23, 2025

प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय कर्मचारी एकतेचा विजय




पदाधिकारी यांच्या पाठपुराव्याने स्व आर. बी. सिंह यांचे स्वप्नं पूर्ण 


दि. २४ (ग्रामीण उदय प्रतिनिधी):उच्च व तंत्र शिक्षण विभागाने राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील प्रयोगशाळा सहाय्यक या पदांना पाचव्या वेतन आयोगानुसार सुधारीत ₹4000-6000 या वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

हा निर्णय मिळवून देण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केलेल्या महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन कर्मचारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी यश संपादन केले आहे. कर्मचारी एकतेच्या बळावर मिळवलेला हा विजय कर्मचारी एकता जिंदाबाद या घोषणेतून उत्साहा साजरा करण्यात आला.

महासंघाचे मार्गदर्शक व लढ्याचे शिल्पकार स्व आर. बी. सिंह साहेब यांच्या विचाराचे स्मरण ठेवून  सातत्यपूर्ण संघटनेचे पदाधिकारी कार्यरत होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे, प्रयोगशाळा सहाय्यकांना न्याय मिळाला आहे. याबद्दल सर्वांनी स्वर्गीय  सिंह साहेबांना अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त केली.

महासंघाचे राज्य अध्यक्ष राजा बढे, कार्याध्यक्ष शशिकांत कामटे , कार्याध्यक्ष गोविंद जोशी, सरचिटणीस डॉ. सुजित तसेच सर्व पदाधिकारी यांचे मनःपूर्वक आभार मानले गेले.

हा निर्णय म्हणजे केवळ प्रयोगशाळा सहाय्यकांचा विजय नसून राज्यातील कर्मचारी एकतेच्या बळाचे मोठे उदाहरण आहे.

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages