ॲड. माणिकराव कोकाटे यांचा जिल्हा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

ॲड. माणिकराव कोकाटे यांचा जिल्हा दौरा


अमरावती दि. 20 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ तथा नंदुरबारचे पालकमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे रविवार, दि. 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

            दौऱ्यानुसार, सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर, अमरावती येथे आगमन व अमरावती विभागातील विविध क्रीडा प्रकारचे खेळाडू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, पालक आणि युवकांच्या विविध अडीअडचणी समजून घेण्यासाठी युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमास उपस्थिती व राखीव. दुपारी 3 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, उप विभागीय अधिकारी कार्यालयासमोर, अमरावती येथून शासकीय विश्रामगृह, अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 3.10 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे आगमन व राखीव. त्यानंतर 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह, अमरावती येथून दर्यापूर मार्गे अकोट, जि. अकोलाकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages