ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांचा दौरा


अमरावती, दि. 20 (ग्रामीण उदय प्रतिनिधी) : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. निलेश हेलोंडे पाटील हे सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

दौऱ्यानुसार, सोमवार, दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता काटोलवरून अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता मिशन कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय इमारत, अमरावती येथे आगमन व कार्यालयीन कामकाज. दुपारी 3 चांदूर रेल्वे कडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता विश्रामगृह, चांदूर रेल्वे येथे आगमन व तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समवेत तालुक्यातील शेतकरी आत्महत्या व शासकीय जमिनीवर चारा लागवड यासंबंधी चर्चा. दुपारी 4 वाजता तहसिलदार, चांदूर रेल्वे यांनी निश्चित केलेल्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास भेट. त्यानंतर सोईनुसार काटोलकडे प्रयाण करतील.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages