विकसीत महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवादाचे दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन - Gramin Uday

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here


Saturday, September 20, 2025

विकसीत महाराष्ट्र 2047 अंतर्गत युवा आणि क्रीडा संवादाचे दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजन


अमरावती, दि. 20 (ग्रामीण उदय प्रतिनिधी): विकसीत महाराष्ट्र 2047 युवा आणि क्रीडा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ अॅड. माणिकरावजी कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.

युवा आणि क्रीडा संवादाच्या कार्यक्रमाचे आयोजनासाठी अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी आशिष येरेकर, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे सुधिर मोरे, व उपसंचालक, क्रीडा व यु सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे संजय सबनिस हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत, या युवा आणि क्रीडा संवाद कार्यक्रमामध्ये अमरावती विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम, बुलडाणा या 5 जिल्ह्यातील पुरस्कार विजेते, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक विजेते खेळाडू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक, पालक, क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, क्रीडा संघटना या प्रमाणे प्रति जिल्हा 50 प्रमाणे एकूण 250 ते 300 व्यक्ती उपस्थित राहणार आहे.

सदर कार्यक्रमांतर्गत वरील सर्व क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्ती क्रीडा प्रकाराशी संबंधित अडचणी, क्रीडा विषयक सुविधा, शासनाकडून असणाऱ्या अपेक्षा, खेळाडूंच्या भविष्यासाठी एक समर्पित क्रीडा करीअर सेल, विविध खेळ संघटनेकडून ग्रामीण खेळाडू शोध, खेळाडूंना आर्थिक सहाय्य, प्रायोजकत्व, क्रीडा मानसशास्त्र व मानसिक आरोग्याचे प्रशिक्षण, महिलांचा खेळ स्पर्धा मधील सहभाग वाढविणे, वार्षिक स्पर्धा कार्यक्रमात सुधारणा, खेळाडूच्या फिटनेस साठी स्पोर्ट्स सायन्स सेंटर तसेच स्ट्रेंथ अॅण्ड कंडीशनींगची निर्मीती या विषयावर  मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, महाराष्ट्र राज्य यांच्याशी थेट प्रश्न विचारू शकतात जेणे करुन अमरावती विभागातील क्रीडा क्षेत्राशी संबंधीत असलेल्या अडीअडचणी, समस्या व त्यावर करावयाचे निराकरण बाबत निर्णय घेणे शासनास शक्य होईल, जेणे करुन पुढील 20 ते 22 वर्षात महाराष्ट्रातील जास्तीत जास्त खेळाडू ऑलिम्पीक सारख्या स्पर्धेत पदके प्राप्त करू शकतील हा मुलभुत उद्देश समोर ठेऊन युवा आणि क्रीडा संवादाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत युवकाच्या समस्या व त्यांचे राष्ट्र उभारणी कसे सहकार्य प्राप्त होऊ शकेल यावर सुध्दा चर्चा करण्यात येणार आहे.

युवा आणि क्रीडा संवादा अंतर्गत उद्योन्मुख, वर्तमान आणि भविष्यातील घडावयाचे खेळाडू व पालकांसाठी सदर चर्चा सत्र हे महत्वपुर्ण आहे करीता अमरावती विभागातील, शहरातील व जिल्ह्यातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक, शिवछत्रपती पुरस्कारार्थी, एकविध खेळ संघटना, क्रीडा व युवक मंडळे यांचे पदाधिकारी तसेच क्रीडा प्रेमी नागरीक यांनी या थेट संवादाकरीता जास्तीत जास्त संख्येने दि. 21 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, येथे उपस्थित राहावे, असे आवाहन क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभागाचे  उपसंचालक गणेश जाधव यांनी केले आहे.


Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages